1380 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या 3340 झाली आहे. यामुळे चिंता आणखी वाढतच चालली आहे.
त्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे 179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालानुसार नवजीवन कॉलनी -1, गरम पाणी-1, पडेगाव-1, जाधववाडी-2, राजाबाजार-1, एन नऊ हडको -1, ठाकरे नगर-1, बजाज नगर -1, एन सहा -1, शिवाजी नगर-1, नागेश्वरवाडी-3, शिवशंकर कॉलनी -2, गजानन नगर-2, छत्रपती नगर -1, दर्गा रोड -1, एकता नगर, हर्सुल -1, हनुमान नगर -1, सुरेवाडी -3, टीव्ही सेंटर -1, एन आठ सिडको-1, श्रद्धा कॉलनी -4, एन सहा, सिंहगड कॉलनी-1, आयोध्या नगर-1, बायजीपुरा-3, कोतवालपुरा-1, नारळीबाग-1, अंबिका नगर, मुकुंदवाडी -4, गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर-1, समता नगर-1, सिंधी कॉलनी -1, बजाज नगर -1, जुना मोंढा, भवानी नगर-1, जयसिंगपुरा-2, सिडको एन अकरा-1, नेहरू नगर, कटकट गेट -1, न्यू हनुमान नगर-1, विजय नगर, नक्षत्रवाडी -1, भाग्य नगर-4, शिवाजी नगर -1, पदमपुरा -1, उत्तम नगर-2, खोकडपुरा-2, टिळक नगर-1, पिसादेवी -1, बीड बायपास -2, सखी नगर -3, जिल्हा परिषद परिसर-1, सारा गौरव बजाज नगर -3, सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर -6, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर -4, जय भवानी चौक, बजाज नगर -1, चिंचवन कॉलनी, बजाज नगर -3, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर-1, दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर-1, देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर-2, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर-1, मांडकी-1, पळशी -5, जय हिंद नगरी, पिसादेवी-1, कन्नड -1, मातोश्री नगर, औरंगाबाद-1 या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 47 स्त्री व 55 पुरुष आहेत.
1781 कोरोनामुक्त; 179 जणांचा बळी
कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 3340 वर गेली आहे. त्यापैकी 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 179 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1380 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
खासगी रुग्णालयात एका रुग्णांचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात मंजुरपुर्यातील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 131, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 47, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 179 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.